युक्रेनची चार गावे रशियाने बळकावली   

किव्ह : युक्रेनच्या उत्तरेकडील सुमे विभागातील सीमेवरील चार गावे रशियान मंगळवारी ताब्यात घेतली आहेत. त्यानंतर बाँब हल्ल्याची तीव्रता या परिसरात घटली आहे.रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी सीमेवर बफर झोन निर्माण करण्याचे आदेश नुकतेच दिले होते. यानंतर सैन्य कारवाई करुन चार गावे ताब्यात घेण्यात आली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून युक्रेनवर ड्रोन, क्षेपणास्त्रांचा मारा रशियाने वाढविला होता. आता त्याची तीव्रता कमी झाली असल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. रशियाकडून आक्रमक कारवाई थांबविण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. दरम्यान, शुक्रवारी आणि रविवारी रात्री रशियाने युक्रेनवर ९०० ड्रोन डागले होते. 
 
त्यापैकी रविवारी रात्रीचा हल्ला सर्वात मोठा ठरला होता.  सुमारे ३५५ ड्रोनचा हल्ल्यासाठी वापर केला. सोमवारी आणि मंगळवारनंतर हल्ल्याचे प्रमाण घटले आहे. रशियाने ६० ड्रोनने हल्ला केल्याचे युक्रेनने सांगितले.

Related Articles